Join us

KGF स्टार यशने घेतली मृत चाहत्यांच्या कुटुंबियांची भेट; म्हणाला, 'स्वत:च्याच वाढदिवसाची भीती...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 14:07 IST

अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी करणाऱ्या तीन चाहत्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

केजीएफ (KGF) स्टार यशने (Yash) काल 38 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाला एक दुर्घटनाही घडली. अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी करणाऱ्या तीन चाहत्यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला. यशने या तीनही चाहत्यांच्या कुटुंबाची नुकतीच भेट घेतली. यशचे चाहते त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी त्याचं कटआऊट लावत होते. याचवेळी वीजेच्या झटक्याने तीन जणांचा मृत्यू झाला.

यशने वाढदिवसाला झालेल्या या दुर्घटनेनंतर मृत आणि जखमी झालेल्या चाहत्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यश आपल्या फिल्म शूटसाठी बाहेर होता. मात्र ही बातमी मिळाल्यानंतर तो शूटिंग सोडून कर्नाटककडे रवाना झाला. दु:खात बुडालेल्या कुटुंबाला त्याने धीर दिला. यश नेहमीच आपल्या चाहत्यांचा प्रचंड आदर करतो. तो दरवर्षी आपल्या वाढदिवसाला चाहत्यांची भेट घेतो. यावेळी पहिल्यांदाच तो व्यस्त शेड्युलमुळे चाहत्यांना भेटू शकला नाही. या दुर्घटनेनंतर यशही फार दु:खी झाला. रिपोर्टनुसार, गदांग जिल्ह्यातील सुरनागी गावाचे हे तीन चाहते होते. मुरली नदाविनमणि, हनमंता हरिजन आणि नवीन गाजी अशी त्यांची नावं होती.

कुटुंबाला भेटल्यानंतर यश म्हणाला,"ही खूपच दु:खद घटना आहे. सगळ्यांना एकच विनंती केवळ मनातून मला शुभेच्छा द्या. या घटना पाहून मला माझ्याच वाढदिवसाची भीती वाटू लागली आहे. अशाप्रकारे प्रेम दाखवू नका. माझी विनंती यापुढे कोणीही बॅनर लावू नका, आपला जीव धोक्यात घालू नका."

यश शेवटचा प्रशांत नील यांच्या 'केजीएफ:चॅप्टर 2' मध्ये दिसला. सिनेमाचा पहिला पार्ट 2018 मध्ये रिलीज झाला होता. सध्या यश आपल्या आगामी 'टॉक्झिक' च्या तयारित व्यस्त आहे.

टॅग्स :यशकेजीएफसिनेमामृत्यूसोशल मीडिया