Join us

राम चरण, अल्लू अर्जुनसह 142 स्टार्सचा आहे एक खास Whatsapp Group, अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 2:42 PM

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर जेवढे सामान्य लोक बोलतात, तितकीच चॅट बॉलिवूड सेलेब्स देखील करतात.

भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अ‍ॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. ऑफिस, फॅमलीसाठी अनेक  Whatsapp Group असतात. आजकाल ही लोकांची गरज बनली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर जेवढे सामान्य लोक बोलतात, तितकीच चॅट बॉलिवूड सेलेब्स देखील करतात. तुम्हाला माहितेय दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण, अल्लू अर्जुनसह 142 स्टार्सचा एक खास Whatsapp Group आहे. 

तेलुगु अभिनेत्री लक्ष्मी मंचूने दाक्षिणात्या कलाकारांचा एक खास  Whatsapp Group असल्याचा खुलासा केला. या Whatsapp Group मध्ये तब्बल  142 सदस्य असल्याचं तिनं सांगितलं. ईटीव्हीच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती तिनं खुलासा केला की, या ग्रुपमध्ये राम चरण, अल्लू अर्जुन आणि राणा दग्गुबती सारखे स्टार्स आहेत. टॉलिवूडमध्ये कौटुंबिक भावना वाढवणे हा या ग्रुपचा उद्देश आहे. शिवाय, अभिनेते एकमेकांच्या प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनमध्ये मदत करू शकतील, यासाठी Group असल्याचं तिनं सांगितलं.

 सेलिब्रिटींच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर काय होते हे जाणून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल. लक्ष्मी मंचू म्हणाली, 'टॉलिवूडमध्ये कौटुंबिक भावना वाढवणे हा या ग्रुपचा उद्देश आहे. जेणेकरुन अभिनेत्यांना एकमेकांच्या प्रोजेक्ट्सचा प्रचार आणि प्रसार करण्यात मदत होईल. यात सर्व अभिनेते आहेत. जेव्हा कोणाचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो. तेव्हा ते आपल्या चित्रपटाचा टीझर किंवा ट्रेलर हा या ग्रुपवर पाठवतात. त्यानंतर सर्वजण सोशल मीडियावर तो पोस्ट करतात. म्हणूनच आम्ही हा ग्रुप तयार केला आहे'.

पुढे ती म्हणाली, 'मी या ग्रुपमध्ये नेहमीच सक्रिय असते. आम्ही हा ग्रुप तयार केला आहे, म्हणूनच मला त्याचा अभिमान आहे. लक्ष्मी मांचू तेलुगु इंडस्ट्रीमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुपरस्टार मोहनलाल यांचा 'मॉन्स्टर' सिनेमात ती झळकली होती. हा तिचा पहिला मल्याळम चित्रपट होता. प्रख्यात टॉलीवूड अभिनेता आणि निर्माते मोहन बाबू आणि विद्या देवी यांची ती मुलगी आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीराम चरण तेजाअल्लू अर्जुन