Maha Kumbh 2025: सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा चालू आहे. यंदाचा हा कुंभमेळा आणखी खास आहे. कारण तो तब्बल १४४ वर्षांनी आलाय. महाकुंभ मेळा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक उत्सव असून यात लाखो भाविक सहभागी होतात. केवळ देशातच नव्हे तर देशाविदेशातील सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या नामांकित व्यक्ती सुद्धा भारतात दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभात सहभागी होऊन गंगेत पवित्र स्नान केलं आहे. अशातच सुपरस्टार अभिनेत्रीने प्रयागराज येथील महाकुंभाला हजेरी लावली आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर 'रॉकीभाई'ला वेड लावणारी श्रीनिधी शेट्टी आहे. श्रीनिधी शेट्टीनं (Srinidhi Shetty Reached Prayagraj) लोकांनी ओळखू नये म्हणून चेहरा झाकला. या लूकमध्ये त्याला ओळखणेही कठीण झालं. तिनं गर्दीत जात गंगाघाट आणि आजूबाजूचा परिसर फिरला. अभिनेत्रीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रगायराजची झलक दिसतेय. श्रीनिधीनं बोटीत बसून गंगेची सफर केली.
श्रीनिधीने कॅप्शनमध्ये लिहलं, 'असं वाटलं की प्रयागराजने मला बोलावलं. काहीच कल्पना किंवा योजना नसताना हा प्रवास घडून आला. मी माझी फ्लाईट बुक केली, राहण्यासाठी जागा शोधली, बॅकपॅक केली आणि पोहचले. मी लाखो लोकांमध्ये माझा मार्ग शोधत आहे. माझ्या बाबांनी शेवटच्या क्षणी परवानगी दिली. पण हा खरोखरच आयुष्यात एकदाच येणारा क्षण होता. म्हणून कोणतेही प्रश्न विचारले गेले नाहीत. एक अनुभव, आठवण जी आयुष्यभर कोरली जाईल". यासोबतचं तिनं #महाकुंभ #प्रयागराज असे हॅशटॅगही वापरले. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिच्या भक्तिभावाची प्रशंसा केली आहे.
दरम्यान, महाकुंभमेळा हा जानेवारी १३ रोजी सुरू झाला असून तो २६ फेब्रुवारी पर्यंत असेल. आपर्यंत अनुपम खेर, भाग्यश्री, मिलिंद सोमन, हेमा मालिनी, महाकुंभमेळ्याला हजेरी लावली. याशिवाय, मराठी अभिनेता प्रवीण तरडे आणि त्याची पत्नी स्नेहल तरडे यांनीदेखील महाकुंभमेळ्यात सहभागी होत सुंदर असा अनुभव घेतला आहे.