Actress Divya Prabha, Air India: मल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभा हिने केरळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की, ९ ऑक्टोबर रोजी मुंबईहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय ६८१ या फ्लाइटमध्ये एका सहप्रवाशाने तिच्याशी गैरवर्तणूक केली. तिने आपल्या इंस्टाग्राम पेजवर लिहिले की, प्रवासी दारूच्या नशेत होता. फ्लाइटमध्ये त्याने माझा छळ केला. एअर होस्टेसला कळवल्यानंतर केवळ इतकीच कारवाई करण्यात आली की त्या व्यक्तीला टेक ऑफ करण्यापूर्वी दुसऱ्या सीटवर हलवण्यात आले.
दिव्या प्रभाने इन्स्टाग्रामवर तिच्या या त्रासाची माहिती देत लिहिले की, 'कोची विमानतळावर उतरल्यानंतर या त्रासाची माहिती विमानतळ आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. ज्यांनी मला विमानतळावर असलेल्या पोलिस मदतीसाठी पाठवले.' या घटनेबाबत तिने आपल्या तक्रारीत लिहिले आहे की, 'तो नशेत असलेला व्यक्ती 12C वरून 12B वर गेला आणि माझी सीट 12A होती. आणि मग काहीही कारण नसताना वाद घालायला सुरुवात केली. तसेच अंगलट करू लागला आणि अयोग्यपणे स्पर्श करू लागला.
यानंतर अभिनेत्रीने एअर होस्टेसला सांगितल्यावर तिने त्याला दुसऱ्या सीटवर बसवले. यापेक्षा जास्त काही केले नाही. त्यानंतर मी एअर इंडियाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी मला बंदरातील पोलीस मदत केंद्रात जाण्यास सांगितले. मग अभिनेत्रीने तिथे तक्रार नोंदवली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी अभिनेत्रीने केली आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे सांगितले. अभिनेत्रीने एअर इंडियाचे कार्यालय आणि विमान कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद निराशाजनक असल्याचे वर्णन केले.