Join us

"ड्रग्सच्या नशेत त्याने माझ्या ड्रेसला...", २९ वर्षीय अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:25 IST

ड्रग्स घेणाऱ्या अभिनेत्यांबरोबर काम करणार नाही, घेतला निर्णय

मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत हेमा कमिटी रिपोर्टमुळे खळबळ उडाली होती. आता आणखी एका अभिनेत्रीने मी टू अंतर्गत आरोप केले आहेत. २९ वर्षीय अभिनेत्री विंसी अलोशियसने (Vincy Aloshious) एका अभिनेत्यावर आरोप केले आहेत. सिनेमाच्या सेटवर त्याने तिच्यासोबत गैरवर्तवणूक केली असा तिने खुलासा केल्याने पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटमध्ये अभिनेत्री विंसी म्हणाली, "जर मला कळलं की एखादा अभिनेता ड्रग्स घेतो तर मी त्याच्यासोबत कधीच सिनेमात काम करणार नाही." विंसीच्या या विधानाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. ट्रोलर्सला उत्तर देत विंसीने व्हिडिओ शेअर केला  आणि तिने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला.

ती म्हणाली,"मी ज्या सिनेमाचं शूट करत होते त्याचा मुख्य अभिनेता ड्रग्स घ्यायचा. त्याने नशेत माझ्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्याच्यासोबत काम करणं खूप कठीण होतं. माझ्या ड्रेसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि मी ते ठीक करण्यासाठी जात होते. तेवढ्यात तो जोर देत म्हणाला 'मीही तुझ्यासोबत येतो आणि तुला ड्रेस नीट करायला मदत करतो.' तो सर्वांसमोर माझा ड्रेस नीट करायला लागला. मलाखूप विचित्र वाटलं. त्याच्या तोंडातून काहीतरी पांढरा द्रव बाहेर पडला. त्यावरुन स्पष्ट कळलं की त्याने ड्रग्स घेतले होते."

ती पुढे म्हणाली, "वैयक्तिक आयुष्यात नशा करणं वेगळी गोष्ट आहे. मात्र आजूबाजूला लोक असताना त्यांना अनकंफर्टेबल करणं हे चूक आहे. म्हणूनच मी इव्हेंटमध्ये तसं विधान केलं होतं."

विंसी अलोशियसने २०२४ साली आलेल्या 'मारिविलिन गोपुरंगल' सिनेमात काम केलं होतं. तसंच जितिन इसाक थॉमस दिग्दर्शित 'रेखा' सिनेमातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं. २०२२ साली तिला केरळ राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला.

टॅग्स :सेलिब्रिटीअमली पदार्थसिनेमाकेरळ