भारतीय सिनेसृष्टीत एकापेक्षा एक कलाकार आहेत. त्यांच्या नावावर आज चित्रपट हिट होत आहे. अमिताभ बच्चन, रजनीकांत यांच्या पावलावर पाऊल ठेवत एक अभिनेता आता या दिग्गजांच्या रांगेत आला आहे. ४ दशकांच्या करिअरमध्ये त्याने ४०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय. कोण आहे हा अभिनेता?
एक काळ असा होता की अभिनेत्याचे दर पंधरा दिवसांनी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज व्हायचे. त्याला पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. हा अभिनेता आहे मोहनलाल (Mohanlal). त्यांनी एका वर्षात तब्बल ३४ सिनेमात काम करुन रेकॉर्ड रचला आहे. यापैकी त्यांचे २५ चित्रपट हिट झाले. 'दृश्यम' हा त्यांचा सर्वात चर्चेतला सिनेमा. नंतर याचं हिंदी व्हर्जन आलं ज्यात अजय देवगणने काम केलं.
मोहनलाल यांनी वयाच्या १८ व्या वर्षीच पदार्पण केलं होतं. सुरुवातीला लूक्सवरुन त्यांना नकार मिळाले. मात्र हळूहळू त्यांना यश मिळत गेलं. १९८६ साल त्यांच्यासाठी खूप लकी ठरलं. दर पंधरा दिवसांनी त्यांचे चित्रपट रिलीज झाले. अशा या सुपरस्टारची संपत्तीही काही कमी नाही. त्यांचा दुबईच्या सर्वात उंच बुर्ज खलिफामध्येही फ्लॅट आहे. तसंच काही हॉटेल चेन्सही आहेत. शिवाय अनेक आलिशान गाड्याही त्यांच्याजवळ आहेत. यात मर्सिडीज, जॅग्वार, रेंज रोवरचा समावेश आहे.
मोहनलाल यांचा 'नेरु' सिनेमा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता. कोर्टरुम ड्रामा सिनेमात दाखवण्यात आला. मोहनलाल यामध्ये वकील होते. त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली.