Join us

हिरवा चुडा अन् हातात हळकुंड! शोभिताला लागणार नागा चैतन्यच्या नावाची हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:04 IST

साखरपुड्यानंतर नागा चैतन्य-शोभिताची लगीनघाई! लवकरच चढणार बोहल्यावर

साऊथ अभिनेता नागा चैतन्य त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. ऑगस्ट महिन्यात नागा चैतन्यने बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, नागा चैतन्य आणि शोभिताने लग्नाबाबत कोणतीच अपडेट चाहत्यांना दिली नव्हती. आता मात्र, त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाल्याचं दिसत आहे. 

शोभिता आणि नागा चैतन्यच्या घरी लगीनघाई सुरू आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या तयारीत आहेत. शोभिताच्या घरी अभिनेत्रीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. लग्नापूर्वीच्या विधींचे काही फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शोभिताने साडी नेसली असून हातात हिरवा चुडाही घातल्याचं दिसत आहे. 

शोभिताच्या घरी लग्नपूर्वीचा Godhuma Raayi Pasupu danchatam म्हणजेच हळद कांडण्याचा कार्यक्रम पार पडला. याचे काही फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. "...आणि सुरुवात झाली" असं कॅप्शन शोभिताने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 

नागा चैतन्यचं शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने समांथा रुथ प्रभूशी लग्नगाठ बांधली होती. २०१७ मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. मात्र अवघ्या काही वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०२१ मध्ये घटस्फोट घेत वेगळं झाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी