साऊथ स्टार नागा चैतन्य त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. समांथा प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या लग्नाच्या तारीखही समोर आली आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. डिसेंबर महिन्यात नागा चैतन्य आणि शोभिता लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ४ डिसेंबरला कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत ते दोघेही सात फेरे घेणार आहेत. "शोभिता आणि नागा चैतन्य लग्न करत आहेत, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा असू द्या", असा मजकूर या वेडिंग कार्डमध्ये आहे.
गेली कित्येक महिने नागा चैतन्य आणि शोभिताच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. मात्र नागा चैतन्य आणि शोभिताने त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलं नव्हतं. अखेर ८ ऑगस्टला साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता ते लग्न करणार आहेत.
नागा चैतन्यने २०१७ मध्ये समांथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. लग्नाआधी ते काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ते लाडके कपल होते. पण, लग्नानंतर ४ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. २०२१ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत होता.