Join us

नागा चैतन्यने पुसून टाकली समांथाची शेवटची आठवण! शोभिताशी लग्न करण्यापूर्वी Ex पत्नीसोबतचा फोटो केला डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:26 AM

शोभिताशी लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यने समांथाबरोबरच शेवटची आठवण पुसून टाकली आहे. नागा चैतन्यने त्याच्या सोशल मीडियावरुन समांथाबरोबरचा शेवटचा फोटो आता डिलीट केला आहे.

साऊथ स्टार नागा चैतन्य त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. समांथा प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शोभिताशी लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यने समांथाबरोबरच शेवटची आठवण पुसून टाकली आहे. 

नागा चैतन्यने त्याच्या सोशल मीडियावरुन समांथाबरोबरचा शेवटचा फोटो आता डिलीट केला आहे. २०१८ मध्ये नागा चैतन्यने फॉर्मुला १ रेस ट्रॅकवरचा समांथाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये रेसिंग कारसोबत समांथा आणि नागा चैतन्य दिसत होते. "मिसेस अँड द गर्लफ्रेंड" असं कॅप्शन या फोटोला नागा चैतन्यने दिलं होतं. शोभिताशी लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यनेन समांथाबरोबरचा हा शेवटचा फोटो डिलीट केला आहे. 

तरीदेखील नागा चैतन्यच्या इन्स्टाग्राम वॉलवर समांथाबरोबरची आणखी एक आठवण अजूनही कायम आहे. नागा चैतन्य आणि समांथाने माजिली या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमाचं पोस्टर मात्र अद्याप नागा चैतन्यने डिलीट केलेलं नाही. पण, समांथाने मात्र घटस्फोट होताच नागा चैतन्यबरोबरचे फोटो डिलीट केले होते. 

काही वर्ष डेट केल्यानंतर नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर ४ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. २०२१ साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत होता. ८ ऑगस्टला साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता लवकरच ते दोघेही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodसेलिब्रिटी