Join us

Video: साखरपुड्यासाठी 'अशी' तयार झाली शोभिता, नजर लागू नये म्हणून केला 'हा' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 11:15 AM

शोभिताने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता

तेलुगू अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलीपालाशी ( Sobhita Dhulipala ) साखरपुडा केला आहे.  ८ ऑगस्ट रोजी हैदराबादमधील घरीच साखरपुड्याचा (Naga Chaitanya Sobhita Dhulipala Engaged) समारंभ पार पडला.  जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी आपले नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियासमोर आले आहेत. आपल्या साखरपुड्यासाठी शोभिता ही खास तयार झाली होती. तिचा एक व्हिडीओ (Sobhita Dhulipala bridal makeup video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

शोभिताने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. ती पारंपरिक अंदाजात सजलेली दिसली.  फिकट गुलाबी रंगाची साडी आणि केसात अबोली गजरा या  शोभिता सुंदर दिसत होती. हा लूक तयार करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये मेकअप आर्टिस्ट तिला नटवताना दिसत आहे. विशेष म्हणजे कुणाची तिला नजर लागू नये म्हणून मेकअप आर्टिस्टने तिच्या कानाच्या मागे काळा टिका देखील लावला. विशेष म्हणजे भारतातील प्रत्येक घरात कुणीही छान नटूनथटून तयार झालं की कोणाची दृष्ट लागू नये यासाठी कानामागे काळा टिका लावला जातो. तोच शोभितानेदेखील लावला.

नागा चैतन्य आणि शोभिता गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. साखपूडा पार पडलेला असाल तरी ते दोघे लग्न कधी करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शोभिता ही 32 वर्षांची असून नागा चैतन्य 37 वर्षांचा आहे.  नागा चैतन्यने 2017 मध्ये समंथा रुथसोबत लग्न केले होते, पण 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.  

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीनागार्जुन