Join us

"शोभिता मला भेटायला घरी आलेली तेव्हा नागा चैतन्यने तिला पाहिलं अन्...", नागार्जुन यांनी सांगितली लेकाची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 15:29 IST

गेल्या काही वर्षांपासून ते डेट करत होते. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांची पहिली भेट नेमकी कशी झाली, याबाबत काहीच माहित नव्हतं. आता खुद्द नागार्जुन यांनीच त्यांच्या लेकाची लव्हस्टोरी सांगितली आहे. 

दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य आणि बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांची लगीनघाई सुरू आहे. डिसेंबर महिन्यात शोभिता आणि नागा चैतन्य लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते डेट करत होते. त्या दोघांचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मात्र त्यांची पहिली भेट नेमकी कशी झाली, याबाबत काहीच माहित नव्हतं. आता खुद्द नागार्जुन यांनीच त्यांच्या लेकाची लव्हस्टोरी सांगितली आहे. 

नागार्जुन यांनी नुकतीच ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी नागा चैतन्य आणि शोभिताची पहिली भेट कशी झाली, याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, "गुडाचरी पाहिल्यानंतर मी पहिल्यांदा शोभिताला भेटलो. सिनेमातील तिचं काम मला आवडलं. आणि हे सांगण्यासाठीच मी तिला कॉल केला होता. जेव्हा हैदराबादमध्ये येशील तेव्हा मला भेट, असं मी तिला म्हटलं होतं. त्यानंतर ती मला भेटायला घरी आली होती. तेव्हा आम्ही सिनेमा आणि आयुष्याबद्दलही खूप गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी चैतन्य तिथे आला होता. मला वाटतं तीच त्यांची पहिली भेट असावी". 

नागा चैतन्य आणि शोभिताने ऑगस्ट महिन्यात साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. नागार्जुन यांनीच शोभिता आणि नागा चैतन्याचा साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं होतं. आता ५ डिसेंबरला ते पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू आहे. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रेटी वेडिंग