Join us

थिएटरमध्येच बकऱ्याचा बळी! नंदमुरी बालकृष्णच्या चाहत्यांच्या विरोधात FIR दाखल, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:36 IST

साउथ सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा 'डाकू महाराज' सिनेमा पाहायला गेलेल्या चाहत्यांनी हा विचित्र प्रकार केलाय

 

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रिमियरवेळेस झालेलं चेंगराचेंगरीचं प्रकरण आणि त्यात झालेल्या एका महिलेचा मृत्यू हे दुर्दैवी प्रकरण ताजं असतानाच आणखी एक विचित्र प्रकार उघड झालाय. साउथ सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण (nandamuri balkkrishna) यांचा 'डाकू महाराज' सिनेमा पाहायला आलेल्या चाहत्यांनी थिएटरमध्ये जीवंत बकरा कापल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे या चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

थिएटरमध्ये बकरा कापणं चाहत्यांना भोवलं

झालं असं की, 'डाकू महाराज' सिनेमा पाहायला नंदमुरी बालकृष्ण यांचे चाहते गेले होते. तिरुपती येथील प्रताप थिएटरमध्ये हे चाहते आनंदात सिनेमा पाहायला गेले. त्यावेळी चाहत्यांनी एका बकऱ्याच्या मानेवर चाकू ठेऊन थिएटरमध्ये त्याचा बळी दिला. याशिवाय या चाहत्यांनी उत्साहात सिनेमाच्या पोस्टरवरही बकऱ्याचं रक्त शिंपडलं. पेटा इंडियाने याची दखल घेतली असून या पाच माथेफिरु चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 

पेटा इंडियाकडून FIR दाखल

याआधीही ज्यु.एनटीआर आणि सैफ अली खान यांच्या 'देवरा पार्ट १' सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळेस अशी विचित्र घटना घडली होती. त्यावेळीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने पेटा इंडियाने या पाच चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदमुरी बालकृष्ण यांचा 'डाकू महाराज' हा सिनेमा भारतभरातील थिएटरमध्ये हाउसफुल्ल सुरु असून या सिनेमात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे.

टॅग्स :Tollywoodनाटक