Join us  

बॉक्स ऑफिस क्लॅश नाही, 'या' कारणांमुळे 'पुष्पा 2'च्या प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 3:54 PM

 'पुष्पा 2' सिनेमाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे.

Pushpa 2 : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun)  'पुष्पा 2' सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्स्कुता आहे. या सिनेमामधील दोन्ही गाणी प्रदर्शित झाली असून ट्रेडिंगमध्ये आहेत. आता चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता सिनेमाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. 

 'पुष्पा 2' सिनेमाची अधिकृत रिलीज तारीख 14 ऑगस्ट 2024 होती. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट पुढे ढकलल्या जात असल्याच्या बातम्या येत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' च्या काही भागांचे शूटिंग बाकी आहे. शिवाय एडिटिंगचेही कामही बाकी आहे. त्यामुळे आता निर्मात्यांनी चित्रपट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा 2' सिनेमा हा येत्या दसऱ्याला, डिसेंबर 2024 किंवा थेट पुढच्या वर्षी पोंगल 2025 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.   तथापि, 'पुष्पा 2' डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. कारण,  'पुष्पा: द राइज' देखील डिसेंबरमध्येच रिलीज झाला होता. हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित झाला होता.. 

 

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटीबॉलिवूडTollywoodसिनेमा