Join us  

जान्हवी कपूर नाही तर मराठमोळी श्रुती मराठे आहे Jr NTR ची हिरोईन, 'देवरा' सिनेमात साकारलीय मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 1:04 PM

'देवरा' सिनेमात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत असेल अशी अपेक्षा होती. पण, 'देवरा' सिनेमात जान्हवीने मुख्य भूमिका साकारलेली नाही. श्रुतीने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.

सध्या सर्वत्र ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत असलेल्या 'देवरा' सिनेमाची चर्चा आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआरसोबत सैफ अली खान, मुरली शर्मा, प्रकाश राज या कलाकारांच्याी मुख्य भूमिका आहेत. २७ सप्टेंबरला हा ज्युनियर एनटीआरचा हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण, प्रदर्शनाआधीपासूनच या सिनेमाची सगळीकडे हवा होती. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरचं सिनेमातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. त्या दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक होते. सिनेमात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत असेल अशी अपेक्षा होती. पण, 'देवरा' सिनेमात जान्हवीने मुख्य भूमिका साकारलेली नाही. 

'देवरा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर राज्य केल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ज्युनियर एनटीआरच्या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेदेखील झळकली आहे. श्रुतीने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. ज्युनियर एनटीआरच्या पत्नीच्या भूमिकेत श्रुती मराठे आहे. श्रुतीला साऊथच्या अभिनेत्रीच्या भूमिकेत पाहून चाहतेही थक्क झाले. याआधीही श्रुतीने अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

'देवरा' सिनेमात एक मोठा ट्विस्ट आहे. जान्हवी कपूर जरी ज्युनियर एनटीआरबरोबर दिसत असली तरी तिला सिनेमात ती फार कमी वेळ स्क्रीनवर दिसते. सिनेमाच्या मध्यंतरानंतर जान्हवीची 'देवरा' सिनेमात एन्ट्री होते. 'देवरा' सिनेमात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत आहे. देवरा आणि वरा अशा दोन भूमिका त्याने साकारल्या आहेत. श्रुतीने देवराच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर वरा या देवराच्या मुलाच्या प्रेमात जान्हवी असल्याचं दाखविण्यात आलं आहे. आता 'देवरा : पार्ट २' मध्ये जान्हवीची मोठी भूमिका दिसू शकते. 

दरम्यान, 'देवरा' सिनेमाने पहिल्या दिवशी ८२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी ३८.२ कोटी आणि तिसऱ्या दिवशी ३९.९ कोटींची कमाई केली. आतापर्यंत या सिनेमाने देशात १६२.२४ कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरश्रुती मराठेजान्हवी कपूर