पॅन इंडिया स्टार पृथ्वीराज सुकुमारनचा (Prithviraj Sukumaran) 'आदुजीविथम - द गोट लाइफ' (Aadujeevitham -The Goat Life) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटातील पृथ्वीराजच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक करत आहेत. आता काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. द गोट लाइफ हा चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
पृथ्वीराज सुकुमारन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'आदुजीविथम - द गोट लाइफ' अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला केवळ समीक्षकांकडूनच उत्तम प्रतिसाद मिळाला नाही तर प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. यासह या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ' 'आदुजीविथम - द गोट लाइफ'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी ७.४५ कोटी रुपये कमवले आहेत.
आठवड्याच्या शेवटी करणार दमदार कमाई‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ची सुरुवात चांगली झाली आहे. अशा परिस्थितीत, विकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल आणि तो मजबूत कलेक्शन करेल अशी निर्मात्यांना आशा आहे. त्याचप्रमाणे देशभरात गुड फ्रायडेची सुट्टी आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाला लाँग वीकेंडचा फायदा मिळू शकतो. सध्या सर्वांच्या नजरा 'आदुजीविथम - द गोट लाइफ'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर खिळल्या आहेत.
'आदुजीविथम - द गोट लाइफ' स्टार कास्टपृथ्वीराज सुकुमारन व्यतिरिक्त अमाला पॉल, जिमी जीन लुईस, शोभा मोहन, केआर गोकुळ, तालिब अल बलुशी, रिक एबी यांच्यासह अनेक कलाकारांनी 'आदुजीविथम - द गोट लाइफ' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केले आहे.