सुप्रसिद्ध अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (pavan kalyan) यांचा मुलगा सिंगापूरमधील एका शाळेला जी आग लागली त्यात अडकला होता. या आगीतपवन कल्याण यांचा ८ वर्षांचा छोटा मुलगा मार्क जखमी झाला. या दुर्घटनेमध्ये मार्कच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. यामुळे मार्कला सिंगापूरमधील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अशातच पवन कल्याण सिंगापूरला जाऊन लेकाला भेटले. पवन आणि मार्क या बाप-लेकाचा भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
मार्कला पवन कल्याण यांनी भारतात आणलं
पवन कल्याण आज सिंगापूरहून हैदराबाद एअरपोर्टला मुलाला घेऊन आले. वडीलांच्या कडेवर घट्ट मिठी मारुन लहानगा मार्क दिसून आला. पवन कल्याणही मुलाला सांभाळताना दिसले. मार्क या मोठ्या दुर्घटनेतून बचावला असल्याने पवन कल्याण आणि त्याचे कुटुंबीय आनंदी आहेत. तरीही मार्कची शारीरिक आणि मानसिक अवस्था सांभाळण्यााठी पवन कल्याण, त्यांची पत्नी आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब पुढे आलं असून सर्वजण मार्कची काळजी घेणार आहेत.
सिंगापूरच्या शाळेत झाली दुर्घटना
काही दिवसांपूर्वी जन सेना पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्क शंकरसोबत जी दुर्घटना घडली त्या संदर्भात माहिती दिली आहे. मार्कला या दुर्घटनेनंतर ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. सध्या उपचार घेऊन मार्कची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्क शंकरचा जन्म १० ऑक्टोबर २०१७ रोजी झाला आहे. तो आता केवळ ८ वर्षांचा आहे असून सिंगापूरमध्ये शिकत आहे.