Join us

रजनीकांत यांच्या गाजलेल्या सिनेमांना संगीत देणारे लोकप्रिय संगीतकार विजय आनंद यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 10:39 AM

रजनीकांत यांच्या गाजलेल्या सिनेमांना संगीत देणारे संगीतकार विजय आनंद यांचं निधन झालंय. (Vijay Anand Passed Away) (Rajinikanth)

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या सिनेमांना संगीत देणारे लोकप्रिय संगीतकार विजय आनंद (Vijay Anand) यांचं ७१ व्या वर्षी निधन झालंय. विजय आनंद यांच्या निधनाने साऊथ मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. विजय गेल्या अनेक दिवसांपासून शारीरिक व्याधींनी ग्रस्त होते. अखेर बुधवारी चेन्नईत (Chennai) त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  विजय आनंद यांनी तब्बल १०० हून अधिक सिनेमांच्या संगीताची धूरा सांभाळली आहे.

 संगीतकार विजय आनंद यांनी १९८२ मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. १९८६ मध्ये विजय यांनी रजनीकांतच्या 'नान आदिमाई इलाई' आणि 'ओरू जीवनथन' या सुपरहिट सिनेमांना संगीत दिलं. आजही या सिनेमांतील संगीत प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी विजय यांच्या निधनाने शोक व्यक्त करत आहेत.

 

 विजय यांनी रजनीकांतच्या  'नान आदिमाई ईलाई' शिवाय  'नानयम इलाथा नान्याम', 'वेत्री मेल वेत्री', 'वाय सोलील वीररादी', 'कवलन अवन कवलन', 'उरुक्कू उबतेसम' आणि इतर अनेक चित्रपटांना संगीत दिलंय. संगीतविश्वातला एक तारा निखळला, अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे.

टॅग्स :रजनीकांतTollywood