Subbaraju gets married : सध्या लग्नसराईचा मौसम सुरू आहे. बरेच सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकत आहेत. आता आणखी अभिनेत्यानं लग्न केलं आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता पी. सुब्बाराजू लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.
पी. सुब्बाराजू याने समुद्रकिनारी काढलेला आपल्या पत्नीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, "Hitched finally !!!". कोणताही गाजावाजा न करत अगदी साध्या पद्धतीने अभिनेत्यानं लग्न केलं आहे. हा लग्न सोहळा समुद्रकिनारी पार पडल्याचं दिसून येत आहे.
समोर आलेल्या फोटोमध्ये पारंपरिक रितीरिवाजानुसार त्यांनी लग्न केल्याचं पाहायला मिळतंय.ृपी. सुब्बाराजू आणि त्याची पत्नी पारंपरिक अंदाजात सजलेले दिसत आहेत. लाल रंगाची साडी आणि केसात गजरा या पारंपरिक अंदाजात नवरी नटलेली दिसतेय. तर पी. सुब्बाराजू पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि उपरणं परिधान केलेलं दिसतंय. दोघाच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.
सुब्बाराजू यांनं तमिळ, मल्याळम, हिंदी आणि कन्नड भाषांमध्येही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पॅन इंडिया स्टार म्हणून त्यानं ओळख मिळवली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा अभिनेत्याचा प्रयत्न असतो. चाहते त्याच्या नव्या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.