सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. प्रेक्षक आवर्जून चित्रपटगृहात जात हा सिनेमा पाहत आहेत. 'सालार' हा सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता 'सालार' च्या ओटीटी अधिकारांची माहिती समोर आली आहे. प्रभासच्या चित्रपटाने शंभर कोटींचा करार केला आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'सालार' आता ओटीटीवर हा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत. ओटीटी राइट्समधून निर्मात्यांनी मोठी रक्कम कमावली आहे. 'सालार' च्या निर्मात्यांनी या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्सला तब्बल 100 कोटींना विकल्याची माहिती समोर येत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. पण, अद्याप निर्मात्यांनी अधिकृत तारीख घोषित केलेली नाही.
'सालार'चा पहिला भाग रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता दुसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. २७० कोटींचं बजेट असलेल्या 'सालार' सिनेमाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. हा सिनेमा २०२३ या वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. इतकंच नाही तर देशातील सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या सिनेमांच्या टॉप १० यादीत हा सिनेमा चौथ्या स्थानावर आहे. 'बाहुबली' नंतर सुपरहिटच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रभाससाठी हा सिनेमा फायदेशीर ठरतोय.