Join us

'सालार' चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज; वर्धराज मन्नारच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 17:22 IST

'सालार' चित्रपटातील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला.

सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सालार' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.  या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. यातच बहुचर्चित मेगा बजेट चित्रपटातील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. पृथ्वीराज सुकुमारच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी त्याचा लूक रिलीज केला आहे. 

पृथ्वीराजचा लूक लक्ष वेधून घेणारा आहे. यात तो दमदार लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटात पृथ्वीराज 'वर्धराज मन्नार' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. वाढदिवशी फर्स्ट लुक रिलीज केल्याबद्दल पृथ्वीराजने चित्रपटाच्या टीमचे आभार मानले आणि त्यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली. तो म्हणाला, संपूर्ण टीमचे, प्रशांत नील, प्रभास आणि सालार यांचे आभार.

'सालार' हा चित्रपट तामिळ, कन्नड व्यतिरिक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नीलने सांभाळली. याआधी प्रशांतने 'केजीएफ चॅप्टर 1' आणि 'केजीएफ चॅप्टर 2' सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सालार यावर्षी 22 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :प्रभासTollywoodसेलिब्रिटी