Join us

'पुष्पा'चा लूक बदलला! तब्बल ४ वर्षांनी अल्लू अर्जुनने कापले दाढी आणि केस, चाहते अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:22 IST

'पुष्पा २' रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. अल्लू अर्जुनने दाढी आणि केस कापले आहेत. त्याचा हा बदललेला लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. 

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन 'पुष्पा २'मुळे चर्चेत आहेत. 'पुष्पा २'च्या स्क्रिनिंगदरम्यान हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. दर रविवारी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासह काही अटी शर्तींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार अल्लू अर्जुन आज पोलीस ठाण्यात हजर झाला होता. मात्र, यावेळी त्याचा लूक बदललेला दिसला. 

गेल्या काही वर्षांपासून 'पुष्पा २'च्या शूटिंगमध्ये अल्लू अर्जुन व्यस्त होता. यासाठी त्याने प्रचंड मेहनतही घेतली होती. अल्लू अर्जुनने दाढी आणि केसही वाढवले होते. तब्बल ४ वर्षांपासून अल्लू अर्जुनचा एकच लूक चाहत्यांना दिसला होता आणि तो म्हणजे पुष्पा. पण, आता 'पुष्पा २' रिलीज झाल्यानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या लूकमध्ये बदल केला आहे. अल्लू अर्जुनने दाढी आणि केस कापले आहेत. त्याचा हा बदललेला लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. 

'पुष्पा २' ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला. २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा'चा हा सीक्वल आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचा आता तिसरा भागही येणार आहे. पुष्पा ३ साठी चाहते उत्सुक आहेत. 'पुष्पा २'ने आत्तापर्यंत तब्बल १ हजार १९९ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना