Join us

'पुष्पा : द रुल'साठी काऊंटडाऊन सुरु, नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 10:18 AM

'पुष्पा द रुल' चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे.

स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जूनचे चाहते त्याच्या आगामी 'पुष्पा 2' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'पुष्पा द रुल' चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलं आहे. हे नवीन पोस्टर पाहून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अल्लूचा खतरनाक लुकमध्ये दिसला आहे. पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पराज'च्या अवतारात असून विचारात मग्न दिसतोय. अल्लू अर्जुनच्या या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू झाली आहे. त्याबरोबरच सिनेमाचं पोस्टरही खूप व्हायरल झालं आहे. 

'पुष्पा द राईज' मधला पुष्पाचा तो लूक आणि त्या पात्रांची स्टाईल लोकांच्या पसंतीस पडली होती. त्यानंतर आता पुढच्या पार्टमध्ये काय असेल याची उत्सुकता चाहत्यांना आहे.  आता हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सुकुमार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटी