Join us  

'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:41 AM

श्रीवल्ली आणि पुष्पा पुन्हा 'सामी' गाण्यावर थिरकले, 'पुष्पा 2'चं कपल साँग पाहिलंत का?

अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) ची उत्सुकता आता वाढतच चालली आहे. 'पुष्पा'च्या सीक्वेलचं पोस्टर, फर्स्ट लूक समोर आलं आहे. आता सिनेमातलं कपल साँगही नुकतंच रिलीज झालं आहे. पहिल्या पार्टमधील 'सामी सामी' गाण्याने चाहत्यांना वेड लावलं होतं. आता सामी गाण्यालाच वेगळा टच देण्यात आला असून काहीसं रोमँटिक असं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'अंगारो के अंबर सा मेरा सामी...' असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. म्हणजे बिहाइंड द सीन्स यामध्ये दाखवण्यात आले आहेत. नेहमीप्रमाणे गाण्यात हटके स्टेप्स प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आहेत. गणेश आचार्य यांनी ही कोरिओग्राफी केली आहे. दिग्दर्शक, कोरिओग्राफरसोबत ऑफ कॅमेरा झालेली मजामस्तीही यात दिसत आहे. गाण्याचे बोल, कोरिओग्राफी, रश्मिकाचा क्युट लूक तर अल्लू अर्जुनचा स्मार्ट लूक चाहत्यांना प्रेमात पाडणारा आहे. 

15 ऑगस्ट रोजी 'पुष्पा 2' रिलीज होणार आहे. सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे. त्याआधी याचा ट्रेलर कधी येतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. चंदन तस्करीमध्ये दादा असणाऱ्या पुष्पा समोर आता डॅशिंग पोलिस ऑफिस असणार आहे. फहाद फाजिलने या पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. दोघांमधील खतरनाक अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. शिवाय पुष्पा आणि श्रीवल्लीची पुढील लव्हस्टोरीही मनोरंजन करणार आहे. सुकुमार यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :पुष्पाTollywoodअल्लू अर्जुनरश्मिका मंदानासंगीतसिनेमा