Join us  

Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:07 PM

Pushpa 2 : अनेक दिवसांपासून चाहते पुष्पा द राइजचा सीक्वल 'पुष्पा २ द रुल'ची वाट पाहत आहेत. याआधी हा सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार होता पण त्यावेळी त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

अनेक दिवसांपासून चाहते 'पुष्पा द राइज' (Pushpa Movie)चा सीक्वल 'पुष्पा २ द रुल'(Pushpa 2 The Rule Movie)ची वाट पाहत आहेत. याआधी हा सिनेमा १५ ऑगस्टला रिलीज होणार होता पण त्यावेळी त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी एका नवीन पोस्टरद्वारे याची पुष्टी केली आहे.

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा २: द रुल' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आधी ऑगस्टमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु काही प्रलंबित कामांमुळे तो डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, डिसेंबरची रिलीज डेटही पुढे ढकलली जाऊ शकते, अशा बातम्या येत होत्या. मात्र, आता निर्माता वासू यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. हा चित्रपट नियोजित तारखेलाच प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हा चित्रपट डिसेंबरमध्येच होणार प्रदर्शित चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी निर्मात्यांनी ७५ दिवसांपूर्वी एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, ७५ दिवसांत, जगाला पुष्पा आणि त्याची अतुलनीय प्रतिमा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी मिळेल का? #Pushpa2TheRule भारतीय चित्रपटसृष्टीत एक अभूतपूर्व अध्याय बनेल. हा सिनेमा ६ डिसेंबर, २०२४ रोजी प्रदर्शित होईल. या घोषणेनंतर चाहत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने लिहिले, 'गेमचेंजर फिल्म येत आहे'. दुसऱ्याने लिहिले की, 'आम्ही धमाकासाठी तयार आहोत'.

चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली?अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदाना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सुकुमार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. तत्पूर्वी, अल्लू अर्जुनने मारुती नगर सुब्रमण्यमच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये या चित्रपटाबद्दल सुरू असलेल्या अफवांबद्दल सांगितले होते. पुष्पा २ २०२५ पर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते या चर्चांना त्याने पूर्णविराम लावला होता. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना