Join us

Pushpa 2: राष्ट्रीय पुरस्कार विजेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' या दिवशी होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 09:42 IST

Pushpa 2 : अल्लू अर्जुन सतत चर्चेत असतो. पुष्पा २ची वाट पाहत असतानाच त्याने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे.

पुष्पा (Pushpa) फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या यशाच्या शिखरावर आहे. एक वर्षापासून अभिनेता आधीच पुष्पा २ (Pushpa 2) साठी चर्चेत आहे. दरम्यान आता त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. आता अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पा २ च्या रिलीजमुळे चर्चेत आला आहे.

२०२१ मध्ये रिलीज झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा द राइज या चित्रपटाने दहशत निर्माण केली होती. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत या अभिनेत्याची चर्चा होती. चित्रपटाच्या कथेपासून ते गाण्यांपर्यंत आणि संवादांपर्यंत पुष्पाच्या प्रत्येक पैलूने लोकांची मने जिंकली. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढील भागाची वाट पाहत आहेत. दरम्यान, पुष्पा २च्या रिलीजच्या तारखेशी संबंधित बातमी समोर आली आहे, ज्यावरून असे सांगण्यात येत आहे की पुष्पाच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुष्पा २ कधी प्रदर्शित होणार?दक्षिण व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी पुष्पा २ची तात्पुरती रिलीज तारीख शेअर केली आहे. रिपोर्टनुसार, पुष्पा द रुल २०२४ मध्ये २२ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होऊ शकते. मात्र, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

पुष्पा २चा ट्रेलरकाही महिन्यांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला होता. अल्लू अर्जुनचा वाढदिवस खास बनवून, निर्मात्यांनी त्याच्या ४१ व्या वाढदिवसाला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, ज्याने तो येताच खळबळ उडवून दिली. पुष्पा २ चा ट्रेलर ८ एप्रिल २०२३ रोजी रिलीज झाला.

चित्रपटाची स्टार कास्टपुष्पा २च्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, फहद फाजील हा चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे. पुष्पा २चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा