Join us

Pushpa 2: महिन्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर फक्त 'पुष्पा २'चा बोलबाला, किती कमावले? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 11:50 IST

एक महिन्यानंतरही बॉक्स ऑफिसवर केवळ अल्लू अर्जुनच्या पुष्पाचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. या सिनेमाचं ३१ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

Pushpa 2: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच सिनेमाचे शोज हाऊसफूल झाले आहेत.  पहिल्या दिवसापासूनच अल्लू अर्जुनच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पुष्पा प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे. एक महिन्यानंतरही बॉक्स ऑफिसवर केवळ अल्लू अर्जुनच्या पुष्पाचाच बोलबाला पाहायला मिळत आहे. या सिनेमाचं ३१ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

प्रदर्शनाच्या दिवशीच या सिनेमाने १५० कोटींच्या घरात कमाई केली होती. पहिल्या दिवशी 'पुष्पा २'ने १६४.२५ कोटींचा गल्ला जमवला होता. एका आठवड्यानंतर सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसलं होतं. मात्र पुन्हा भरारी घेत पुष्पाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला. आता महिन्याभरानंतरही पुष्पाचं बॉक्स ऑफिसवरील स्थान कायम आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने एका महिन्यात तब्बल १ हजार १९९ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

२०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा'चा सीक्वल असलेल्या 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांना तब्बल ३ वर्ष वाट पाहावी लागली. 'पुष्पा' प्रमाणेच 'पुष्पा २'ला देखील प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचा आता तिसरा भागही येणार आहे. पुष्पा ३ साठी चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना