'पुष्पा 2' सिनेमा अवघ्या काहीच तासांमध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सिनेमाची गाणी, पोस्टर, टीझर, ट्रेलर अशा सर्व गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अशातच 'पुष्पा 2' कसा आहे, याविषयीचा पहिला Review समोर आलाय. त्यामुळे थिएटरमध्ये जायच्या आधी 'पुष्पा 2' पाहण्याचा विचार करत असाल, तर पहिला Review नक्की वाचा. (pushpa 2 review)
'पुष्पा 2'चा पहिला Review समोर
सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या अशी ओळख असणाऱ्या Umair Sandhu यांनी 'पुष्पा 2' पाहून त्यांचा Review दिलाय. Umair यांनी सांगितलंय की, "'पुष्पा 2' हा ब्लॉकबस्टर पैसा वसूल सिनेमा आहे. अल्लू अर्जुची स्टार पॉवर आणि दिग्दर्शक सुकुमार यांची हुशारी याचा अनुभव सिनेमा पाहून येतो. क्लासेस आणि मासेस या दोन्ही वर्गांना आवडेल असा पैसा वसूल एंटरटेनर सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सर्व रेकॉर्ड मोडेल याची खात्री आहे.
उमेर यांनी पुढे लिहिलंय की, "अल्लू अर्जुन त्याच्या खास लूक आणि दमदार अभिनयाने प्रभाव पाडतो. त्याने सिनेमात केलेली अॅक्शन टॉप क्लास आहे. अल्लू अर्जुनला आणखी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळेल यात शंका नाही. रश्मिकानेही चांगला अभिनय केलाय. पण अभिनेता फहाद फासिल संपूर्ण सिनेमात भाव खाऊन जातो. सिनेमाचा क्लायमॅक्स हा सिनेमाचा USP आहे. मध्यंतराचा क्षण माइंडब्लोईंग आहे. याआधी कधीही न बघितलेला वेगळ्या धाटणीचा हा मसाला एंटरटेनमेंट सिनेमा आहे." 'पुष्पा 2' उद्या ५ डिसेंबरला जगभरात रिलीज होतोय.