Join us

Pushpa 2 : बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' ची क्रेझ कायम, किती कोटींचा गल्ला जमवला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:23 IST

 दिग्गजांनाही मागे टाकत या सिनेमानं भारतीय चित्रपटांच्या इतिहासात नवे रेकॉर्ड रचले आहेत.

Pushpa 2: The Rule Box Office Collection : सूपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा २ - द रुल' (Pushpa 2 The Rule) या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा २ - द रुल'नं संपूर्ण साऊथ फिल्म इंडस्ट्री (South Film Industry) आणि बॉलिवूड चित्रपटांना पाणी पाजलं आहे.  दिग्गजांनाही मागे टाकत या सिनेमानं भारतीय चित्रपटांच्या इतिहासात नवे रेकॉर्ड रचले आहेत. बॉक्स ऑफिसच्या समोर आलेल्या आकड्यानुसार आता सिनेमाने १८३१ कोटींहून अधिक कमाई करून मोठी झेप घेतली होती. 

 'पुष्पा २ - द रुल' सिनेमानं हिंदीत ८०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा दाक्षिणात्य चित्रपट बनण्याचा बहुमानही पटकावला आहे. शाहरुख खान, सलमान खान किंवा आमिर खानच्या एकाही चित्रपटानं एवढी कमाई केलेली नाही.   ५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं एकूण १८३१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा सोमवारी सिनेमागृहातील ३३वा दिवस होता. परंतु त्याच्या कमाईचे आकडे कमी झालेले नाहीत. अजूनही चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करताना पाहायाला मिळत आहेत. सिनेमाची कथा एकदम ताजी आहे आणि रंजकपणे रचलेली आहे. ॲक्शन सीन्स अप्रतिम आहेत. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करतोय.  'पुष्पा २ - द रुल' सिनेमाचं सुकुमार यांनी लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केले आहे. 

टॅग्स :अल्लू अर्जुनसेलिब्रिटी