Join us

'पुष्पा' फेम अभिनेत्याने ३८व्या वर्षी बांधली लग्नगाठ, डॉक्टर आहे पत्नी; लग्नाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:41 IST

'पुष्पा' फेम अभिनेत्यानेचं शुभमंगल सावधान झालं आहे.

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. या नववर्षाच्या सुरुवातीपासूनच कलाकारांनी त्यांच्या लग्नाचे बार उडवून दिले आहेत. मराठी सेलिब्रिटी आणि बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारही लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. आता 'पुष्पा' फेम अभिनेत्यानेचं शुभमंगल सावधान झालं आहे. 

'पुष्पा'फेम अभिनेता दाली धनंजया वयाच्या ३८व्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. पारंपरिक पद्धतीने दालीने धन्यता गौरकलार हिच्याशी विवाह केला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत दाली आणि धन्यताने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मैसूर येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. आयुष्यातील या खास क्षणासाठी अभिनेत्याने धोतर आणि फेटा असा पारंपरिक पोशाख केला होता. तर साडी आणि खड्यांच्या ज्वेलरीत धन्यता नटली होती. धन्यता ही पेशाने डॉक्टर आहे. 

दरम्यान, दाली धनंजया हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. 'पुष्पा'मध्ये त्याने जाली ही भूमिका साकारली होती. या सिनेमात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत होता. दाली धनंजयाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एक अभिनेता असण्याबरोबरच तो निर्मातादेखील आहे. 

टॅग्स :Tollywoodसेलिब्रेटी वेडिंग