साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या Allu Arjun) 'पुष्पा' सिनेमात पुष्पाच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता जगदीश (Jagdish) याला अटक करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वीच एका महिलेच्या आत्महत्येप्रकरणी त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. तर आता जगदीशने स्वत:च त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. खाजगी फोटो लीक करण्याची भीती दाखवत तो महिलेला ब्लॅकमेल करत होता.
अभिनेता जगदीशला पुंजागुट्टा पोलिसांनी अटक केली असून त्याला कोर्टात हजर केल्यानंतर चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. ही घटना 29 नोव्हेंबरची आहे ज्यादिवशी ज्युनिअर आर्टिस्टने आत्महत्या केली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर असं समजलं की अभिनेता जगदीश तिला प्रायव्हेट फोटोचा आधार घेत ब्लॅकमेल करत होता. याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. जगदीशने एका अन्य माणसाच्या मदतीने गुपचूप महिलेचे फोटो काढले होते.
माध्यम रिपोर्टनुसार, जगदीशने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याने वाईट हेतूने महिलेचे फोटो घेतल्याचं कबूल मान्य केलं. तसंच तो फोटो लीक करेल असं सांगत महिलेला ब्लॅकमेल करत होता हेही त्याने मान्य केलं. जगदीशने पोलिसांसमोर माहिती दिली की ती महिला दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत होती आणि हे बघून त्याचा जळफळाट व्हायचा. जगदीश त्या महिलेला 5 वर्षांपासून ओळखत होता मात्र 'पुष्पा' च्या यशानंतर ते वेगळे झाले. मात्र जगदीश तिच्यापासून दूर जाऊ शकत नव्हता. काही दिवसांपूर्वीच ब्लॅकमेल प्रकरण सुरु झालं आणि याला कंटाळून महिलेने आत्महत्या केली.न्यायालयाने जगदीशला १४ दिवसांच्या रिमांडवर ठेवण्याचे निर्देश दिलेत. तर १४ दिवस पूर्ण होण्याआधीच त्याने गु्न्ह्याची कबूली दिली आहे.
जगदीशने 2018 साली 'निरुद्योगा नातुलु' सिनेमातून पदार्पण केले. तर 2019 मध्ये त्याने 'मल्लेशम' आणि 2020 मध्ये 'पलासा १९७८' मध्ये भूमिका साकारली. 2021 मध्ये आलेल्या 'पुष्पा' सिनेमाने त्याला खरी ओळख मिळाली.