अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा: द रुल' (Pushpa The Rule) ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार आहे. पुष्पा : द राइज' या पहिल्याच भागातून अल्लू अर्जुनने आपल्या हटके स्टाईलने चाहत्यांना प्रेमात पाडलं. तर आता 'पुष्पा : द रुल' यासीक्वेलमधून तो पुन्हा चाहत्यांवर भुरळ पाडायला येणार आहे. 'पुष्पा फ्लावर नही फायर है मै' हा डायलॉग तर प्रचंड गाजला. सिनेमात पुष्पा लाल चंदनाची तस्करी करण्याचा काळा धंदा करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यादरम्यानचे जंगलातील सीन्स तर अप्रतिम आहेत. हे सीन्स नक्की कुठे शूट केले गेले माहितीये का?
अल्लू अर्जुन आज 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी 'पुष्पा : द रुल' चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात पुष्पा लाल चंदनाच्या लाकडांची तस्करी करत असतो. यासाठी ज्या जंगलात लाल चंदन तोडल्याचं चित्रीत करण्यात आलं ते आंध्र प्रदेशच्या 'मरेदुमल्ली' मध्ये आहे. या जंगलातील 'पाम बुक्का' मध्ये लाल चंदन तोडण्याचे सीन्स चित्रीत झाले होते. शूटसाठी संपूर्ण टीमला त्या जंगलात नेण्यासाठी मेकर्सला रोज ३०० गाड्यांची व्यवस्था करावी लागायची. तस्करीच्या गाड्यांचे सीन शूट करण्यासाठी मेकर्सला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. संपूर्ण जंगल परिसर असल्याने मेकर्सला जंगलातच एक कच्चा रस्ता बनवावा लागला. यानंतर तस्करी करणाऱ्या गाड्यांचं शूट करण्यात आलं. सिनेमात दाखवण्यात आलेलं चंदन हे अर्थात खोटंच होतं.
पुष्पा 2 मध्ये अल्लू अर्जुनचा चंदन तस्करीचा धंदा पुढे कसा चालतो, नवीन आलेल्या पोलिस ऑफिसरकडून त्याला नेमका काय धोका असतो हे सिनेमात पाहता येणार आहे. दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक अक्षरश: आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा २ मधून अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. 15 ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.