Join us

योगी आदित्यनाथांच्या पाया का पडलो? खुद्द रजनीकांतनेच दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 10:04 AM

रजनीकांत योगी आदित्यनाथांच्या भेटीला आले तेव्हा कारमधून उतरताच त्यांनी पाया पडून मुख्यमंत्र्यांचे आशिर्वाद घेतले.

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्यांच्या 'जेलर' (Jailer) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला जेलर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, रजनीकांत सध्या उत्तर भारत दौऱ्यावर असून, त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन जेलर चित्रपट पाहिला. भेटीदरम्यान, रजनीकांत यांनी योगींच्या पाया पडून आशीर्वादही घेतला. रजनीकांत योगींच्या पाया पडल्याने प्रचंड ट्रोल झाले. आता यावर थलायवाने स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले रजनीकांत?

रजनीकांत योगी आदित्यनाथांच्या भेटीला आले तेव्हा कारमधून उतरताच त्यांनी पाया पडून मुख्यमंत्र्यांचे आशिर्वाद घेतले. या कृत्यामुळे रजनीकांत सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाले. 'काय गरज होती पाया पडायची?'असे प्रश्न त्यांना विचारले जाऊ लागले. अखेर यावर थलायवाने स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले,'मी जे केलं ती माझी सवयच आहे. साधू असो किंवा संन्यासी किंवा योगी, मी त्यांचे चरणस्पर्श करतो. मग अगदी समोरचा माझ्यापेक्षा लहान का असेना. मी सवयीप्रमाणेच केलं.'

रजनीकांत यांनी थोडक्यात ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. एकीकडे 'जेलर' सिनेमा तुफान कमाई करत असतानात रजनीकांत दौऱ्यावर आहेत. जेलरने वर्ल्डवाईड तब्बल ५०० कोटींची कमाई केली आहे. दोन वर्षांनंतर रजनीचा सिनेमा आल्याने चाहत्यांनीही भरभरुन प्रतिसाद दिला आहे. 

टॅग्स :रजनीकांतउत्तर प्रदेशसिनेमाट्रोल