साऊथ सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) रुग्णालयात दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त आहेत. त्यांच्यावर सर्जरीही झाल्याची चर्चा आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. रजनीकांत लवकर बरे व्हावे म्हणून चाहते प्रार्थनाही करत होते. आता नुकतंच डॉक्टरांनी रजनीकांत यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत.
अभिनेते रजनीकांत यांना सोमवारी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता रुग्णालयाने दिलेल्या हेल्थ अपडेटनुसार, 'रजनीकांत यांना हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिनीला सूज आली होती. यावर इलाज केला गेला. ट्रांस कॅथेटर द्वारे सर्जरी केली गेली. त्यांना एक स्टेंट लावला होता ज्यामुळे सूज कमी झाली. त्यांच्या शुभचिंतकांना हेच सांगणं आहे की सगळं व्यवस्थित झालं आहे. आता ते स्थिर आहेत. येत्या दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल." रजनीकांत यांना शुक्रवारी डिस्चार्ज मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा रजनीकांत यांच्या पत्नीला फोन करुन चौकशी केली होती. त्यांना हिंमत दिली होती. २०२० सालीही त्यांना बीपी मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना महिनाभराचा आराम करण्याचा सल्ला दिला होता.
रजनीकांत आगामी 'वैट्टैयन' सिनेमात दिसणार आहेत. याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. ज्ञानवेल राजा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.