Join us  

हटके स्टाईलमध्ये एन्ट्री अन् गुंडांची धुलाई, 'लाल सलाम' मधील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 9:39 AM

टीझरची सुरुवात त्यांच्या हटके स्टाईलमध्ये होते. याचा Video सध्या व्हायरल होतोय.

'थलायवा' रजनीकांत (Rajinikanth) यांनी आपल्या 73 व्या वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट दिलं आहे. त्यांच्या आगामी 'लाल सलाम' (Lal Salaam) सिनेमाचा पहिला लूक त्यांनी शेअर केला आहे. हा लूक पाहून चाहते अचंबित झाले आहेत. रजनीकांत त्यांच्या नेहमीसारख्याच कडक लूकमध्ये दिसत आहेत. टीझर आणि फर्स्ट लूकमुळे सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टीझरची सुरुवात त्यांच्या हटके स्टाईलमध्ये होते. कुर्ता आणि पायजमा घालून ते दरवाजा जोरात उघडत बंगल्यातून बाहेर पडतात. सुरुवातीलाच गुंडांची धुलाई करतात. एका गल्लीत आपल्या आलिशान गाडीतून उतरतात आणि इथेच त्यांच्या अॅक्शनला सुरुवात होते. गुंडांची रजनीकांत स्टाईल धुलाई या सिनेमातही बघता येणार आहे. यानंतर ते टोपी घालून नमाज पठण करतात. त्याच्याजवळ कुराणही दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय.

'लाल सलाम' तमिळ भाषेतील स्पोर्ट्स ड्रामा फिल्म आहे. यामध्ये रजनीकांत मोईदीन भाई ही भूमिका साकारत आहेत. रजनीकांत यांच्याशिवाय सिनेमात विष्णु विशाल, विक्रांत, विग्नेश आणि जीविता हे स्टार्सही आहेत. रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या सिनेमाची लेखिका आणि दिग्दर्शिका आहे.

मार्च 2023 मध्ये 'लाल सलाम'च्या शूटला सुरुवात झाली. तर ऑगस्टमध्ये शूटिंग संपलं. जानेवारी 2024 मध्ये पोंगलच्या मुहु्र्तावर सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :रजनीकांतसिनेमा