दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या पत्नी लता मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा खटला पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. आता लता रजनीकांत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने लता रजनीकांत यांच्यावरील सर्व आरोप आणि खटले रद्द करण्याचा कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेशदेखील पूर्णपणे रद्द केला आहे.
अभिनेते रजनीकांत यांच्या पत्नी लता यांच्यावर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. 'कोचादाइया' या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनसाठी जे पैसे त्यांना देण्यात आले होते, त्या पैशांचा त्यांनी गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी लता यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनचे पैसे अद्यापही दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेशलता रजनीकांत यांनी या प्रकरणात कारवाईला सामोरे जावे किंवा दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. कर्नाटकात लता रजनीकांत यांच्याविरुद्ध आयपीसीच्या १९६, १९९, ४२० आणि ४६३ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली होती. पण न्यायालयाने लता यांना दिलासा देत २०२२ मध्ये एफआयआर रद्द केला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा हा आदेश रद्द केला आहे.
काय आहे हे प्रकरण?हे संपूर्ण प्रकरण रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने बनवलेल्या 'कोचादाइया' चित्रपटाशी संबंधित आहे. याचिकाकर्ते अबीर चंद नहार आणि मधुबाला नहार यांनी सांगितले की, त्यांनी या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये दिले होते. मात्र लता यांनी कंपनीला त्यांचा हिस्सा दिला नसल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.