तेलुगू सुपरस्टार राम चरण(Ram Charan)चा चित्रपट 'गेम चेंजर' (Game Changer Movie) या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. एस शंकर दिग्दर्शित या चित्रपटात राम चरणसोबत कियारा अडवाणी (Kiara Advani) दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता आताच वाढवली आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला रामचरणने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याची घोषणा केली होती. इंस्टाग्रामवर, अभिनेत्याने चित्रपटाच्या सेटवरील पहिल्या दिवसाचा आणि शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो देखील शेअर केला आहे. त्याने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचे सांगितले होते. हा एक राजनितीक ड्रामा आहे. गेंम चेंजर हा चित्रपट १० जानेवारी, २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
गेम चेंजर स्टारकास्टरामचरण आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त या चित्रपटात अंजली, एसजे सूर्या, जयराम, सुनील, श्रीकांत, समुथिराकनी आणि नस्सर यांसारखे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटात राम चरण राम मदन या आईएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. कियारा अडवाणीने चित्रपटात त्याच्या लेडी लव्हची भूमिका साकारली आहे, यासोबतच तीदेखील आईएएस अधिकारी असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले असून हा त्यांचा पहिला दिग्दर्शकीय चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली आहे. थमन यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.