लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाची ख्याती रुपेरी पडद्यावर मांडणारा 'छावा' हा सिनेमा शुक्रवारी म्हणजेच 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) व अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांच्या मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळाले आहे. अभिनयाचं सर्वच स्तरांतून जोरदार कौतुक केलं जात आहे. अशातच चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
रश्मिका मंदानाने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. तिनं लिहलं, "मी वक्त्यापेक्षा चांगलं लिहू शकते, म्हणून हे... मिमी हा चित्रपट इतका आवडला की मला लक्ष्मण सरांना माझ्या 'गुडबाय' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यासाठी मेसेज केला आणि तेव्हाच हा प्रवास सुरू झाला. सरांनी लगेच मला विचारलं की ते मला फोन करू शकतात का, यानंतर त्यांनी कॉल केला आणि फोनवर बोललो. पुढच्या चित्रपटासाठी त्यांनी मला भेटण्यासाठी विचारलं. मला वाटलं की, ती फक्त चांगलं बोलत आहेत. पण प्रत्यक्षात भेट झाली आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला की ते घडलं...यासाठी मी कायम आभारी आहे".
पुढे तिनं लिहलं, "मला कथा माहित नव्हती. ते माझ्याकडे का आले हे मला माहित नव्हतं. त्यांनी मला महाराणी म्हणून कसं पाहिलं हे मला कळालं नाही. मला काय घडत आहे हे देखील कळत नव्हतं.. जेव्हा मी प्रत्यक्षात कथा ऐकली तेव्हा मी गोंधळले, पण खूप कृतज्ञ वाटत होतं आणि भारावून गेले. इतकी आनंदी होते की मला काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नव्हतं. मला माहित नव्हते की मी हे कसं साध्य करणार. महाराणी येसूबाईची भूमिका दक्षिणेकडील एक मुलगी साकारेल असा विचारही मी केला नव्हता. म्हणूनच मला अशा लोकांसोबत काम करायला आवडतं जे आपल्याला सीमांच्या पलीकडे स्वप्न पाहतात. आणि मग रुपेरी पडद्यावर महाराणी अवतरल्या... त्या शक्तिशाली आहेत, त्या सुंदर आहेत, त्या खऱ्या महाराणी आहेत. त्यांच्यातील प्रेम दैवी, आदरणीय आहे, जे शब्दात व्यक्त केलं जाऊ शकत नाही". ज्याच्याशी मी खरोखरच जोडले गेले. त्यांच्यातील प्रेम इतकं शुद्ध आहे की, ते दैवी आहे. आदरणीय आहे, इतकं खरं आहे की महाराज आणि महाराणी नेहमीच शब्दांच्या पलीकडे जोडलेले असतात".