Join us

रश्मिकाने विजय देवरकोंडासोबत साजरा केला वाढदिवस, दोघांकडून 'तो' फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:47 IST

रश्मिका मंदानाचं फक्त करिअरचं नाही तर अभिनेत्रीचं लव्ह लाईफही जोरदार आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिला आज कुठल्याही परिचयाची गरज नाही. दाक्षिणात्य इंडस्ट्री आणि बॉलिवूड दोन्हीकडे तिनं आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्रीच्या कारकिर्दीचे वारे उंच शिखरावर वाहत आहेत. फक्त करिअरचं नाही तर अभिनेत्रीचं लव्ह लाईफही जोरदार आहे. ती अभिनेता विजय देवरकोंडाला (Vijay Deverakonda) डेट करत आहे. रश्मिका आणि विजय हे आपलं डेटिंग लवपण्याचा प्रयत्न करतात.  पण, नेटकऱ्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही. पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी रश्मिका आणि विजयची चोरी (Vijay Deverakonda And Rashmika Mandanna Spark Dating Rumors) पकडली आहे. 

नुकतंच रश्मिकानं २९ वा वाढदिवस साजरा केला. रश्मिकाच्या खास दिवशी विजय तिच्यासोबत होता. पण, दोघांनी सोशल मीडियावर एकत्र असलेले फोटो पोस्ट केले नाहीत. रश्मिकानं इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात ती सुमुद्रकिनारी उभी असून ती स्वत:साठी बर्थडेचं गाणं गाताना दिसली. रश्मिका नेहमीप्रमाणे निळ्या रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे विजयने त्याच्या व्हॅकेशनचे काही फोटोही शेअर केले होते. यावेळी रश्मिका आणि विजयच्या फोटोतील ठिकाण एकच असल्याचं नेटकऱ्यांनी हेरलं. 

रश्मिकाचं विजय देवरकोंडा सोबत नाव कायमचं जोडलं जातं. दोघांनी आतापर्यंत 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' या चित्रपटात सोबत काम केलेलं आहे. दोन्ही चित्रपटांमधील त्यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश असलेली रश्मिका गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असून दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातं. रश्मिका आणि विजयच्या नात्याला त्यांच्या कुटुंबीयांकडूनही हिरवा कंदील मिळल्याची माहिती आहे.

रश्मिकाच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात दिसली. यानंतर तिचे 'थामा' आणि 'पुष्पा ३' सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर विजय हा लवकरच 'किंगडम' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच तो 'पुष्पा ३'मध्ये झळकणार असल्याचीही चर्चा आहे.  

टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडा