रश्मिका मंदान्ना ही फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका मंदान्ना मिडियावरही नेहमी ॲक्टीव्ह असते आणि बऱ्याचदा तिच्या चाहत्यांना ती फिटनेस विषयी काही टिप्स देत असते. रश्मिकाने तिचा एक वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये रश्मिका पांढऱ्या टी-शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये व्यायाम करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर रश्मिकाने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून चाहते तिच कौतुक करत आहेत. स्लिम आणि झीरो फिगर असणं हे रश्मिकाला मान्य नाही. तिला वाटतं की स्लिम राहण्यापेक्षा आपण निरोगी आणि सशक्त असणं अधिक गरजेचं आहे. हा उद्देश समोर ठेवूनच तिने तिचं वर्कआऊट प्लॅन असतं.
रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच अल्लू अर्जुनसोबत पुष्पा 2: द रुलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा: द राइज या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात ३३२ कोटींची कमाई केली होती. आता पुष्पा 2: द रुल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
याशिवाय रश्मिका रणबीर कपूरसोबत संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. या दोघांशिवाय अॅनिमलमध्ये अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी यांच्याही भूमिका आहेत. रश्मिकाने कन्नड सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने सलग हिट सिनेमांमध्ये काम केले.