'कांतारा'मुळे (Kantara) फक्त देशभरातच नाहीतर, संपूर्ण जगभरात नावाजलेला अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) सध्या चर्चेत आहे. पण, 'कांतारा पार्ट २' (Kantara Part 2) मुळे नाहीतर, त्याच्या आगामी नव्या चित्रपटामुळे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) ऋषभ शेट्टीच्या अपकमिंग फिल्मचं पोस्टर व्हायरल होत आहे. ऋषभ शेट्टी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. 'जय हनुमान' असं चित्रपटाचं नाव आहे.
ऋषभ शेट्टीनं 'जय हनुमान' (Jai Hanuman) चित्रपटाचं शानदार पोस्टर इन्टाग्रामवर शेअर केलं आहे. हा एक बीग बजेट चित्रपट असणार आहे. प्रशांत वर्मा (Prasanth Varma) यांच्या 'हनुमान'चा हा सिक्वेल असणार आहे. 'हनुमान' प्रेक्षकांना खूप आवडला होता. यात तेजा सज्जा (Teja Sajja) मुख्य भूमिकेत होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 'जय हनुमान' चित्रपटाचे पहिलं पोस्टर रिलीज करून निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. आता पुन्हा काल निर्मात्यांनी चित्रपटाचं आणखी एक पोस्टर रिलीज केलं.
'कांतारा' चित्रपटात ऋषभ शेट्टीने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना प्रभावित केलं होतं. आता या पौराणिक चित्रपटात तो दिसणार असल्यानं चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या. प्रशांत वर्माचा 'हनुमान' हा २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारा तेलुगू चित्रपट होता. या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर २०१.६३ कोटी रुपयांची कमाई केली. प्रशांत वर्माच्या सिनेमॅटिक विश्वातील हा चित्रपट पौराणिक सुपरहिरोवर आधारित आहे. 'जय हनुमान' हा चित्रपट 'हनुमान'सारखा बॉक्स ऑफिसवर धमाल करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे असेल.