Join us

गुपचूप लग्नाच्या अफवांवर साई पल्लवी संतापली; अफवा पसरवणाऱ्यांना खडसावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 6:33 PM

साई पल्लवीने व्हायरल झालेल्या फोटोंवर संताप व्यक्त केलाय. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना तिनं चांगलंच खडसावलं. 

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि राजकुमार पेरियासामी या दोघांचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये साई पल्लवी एका व्यक्तीबरोबर दिसत आहे. या फोटोत दोघांच्याही गळ्यात वरमाला दिसत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर साई आणि राजकुमार पेरियासामी यांनी गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. आता या व्हायरल झालेल्या फोटोंवर साई पल्लवीने संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना तिनं चांगलंच खडसावलं. 

साई पल्लवीने एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं की, 'प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला अफवांची पर्वा नाही. पण जेव्हा त्यात कुटुंबातील लोकांचा, मित्रांचा समावेश असतो तेव्हा मला बोलावंच लागेल. माझ्या चित्रपटाच्या पूजा समारंभातील फोटो जाणूनबुजूने क्रॉप करण्यात आला आणि घृणास्पद हेतूने प्रसारित करण्यात आला. कामासंदर्भातील चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी असताना, जेव्हा या बेकार गोष्टींसाठी स्पष्टीकरण द्यावं लागणं हे निराशाजनक आहे.अशा प्रकारची परिस्थिती निर्माण  करणे हा निव्वळ नीचपणा आहे'.

दरम्यान, साई पल्लवीचा हा फोटो एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे. या फोटोत तिच्याबरोबर तिचा सहकलाकार  राजकुमार पेरियासामी  दिसत आहे. एसके२१ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या पूजा समारंभाचे आयोजन केले असताना व्हायरल होणारा फोटो क्लिक करण्यात आला होता.

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर साई पल्लवीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. साई तिच्या सिनेमामध्ये अत्यंत कमी मेकअपमुळे चर्चेत येत असते. इतकंच नाही तर एकदा तिने २ कोटी रुपयांची एक फेअरनेस क्रीमची जाहिरात धुडकावली होती. प्रेक्षकांमध्ये साई पल्लवीची खूप क्रेझ आहे.  

टॅग्स :साई पल्लवीTollywoodसेलिब्रिटी