Join us

'यश १९'मध्ये रॉकी भाईसोबत रोमांस करताना दिसणार साई पल्लवी?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 19:45 IST

Yash : जेव्हापासून 'रॉकी भाई' म्हणजेच यशने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे, तेव्हापासून काही नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे चाहत्यांचा उत्साहही वाढत आहे.

जेव्हापासून 'रॉकी भाई' म्हणजेच यश(Yash)ने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे, तेव्हापासून काही नवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे चाहत्यांचा उत्साहही वाढत आहे. यशने नुकतेच जाहीर केले होते की तो त्याच्या नवीन प्रोजेक्टचे नाव ८ डिसेंबरला सांगणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येकजण असे गृहीत धरत होता की हा नवीन प्रोजेक्ट KGF 3 असेल, कारण आतापर्यंत यशने त्याचा लूक 'रॉकी भाई' सारखाच ठेवला आहे. पण तसे झाले नाही. आता चाहते ८ डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, एक अपडेट समोर आली आहे आणि ती म्हणजे साई पल्लवी 'यश १९' मध्ये अभिनेत्यासोबत दिसणार आहे. तथापि, अद्याप काहीही पुष्टी नाही.

123telugu.com च्या रिपोर्टनुसार, साई पल्लवी 'यश १९'मध्ये यशसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात दोघांमध्ये अनेक रोमँटिक सीन्स पाहायला मिळणार आहेत. असे झाले तर ही साई पल्लवीचे कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण असेल. साई पल्लवीने आतापर्यंत फक्त तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

'यश १९' ची कथा, दिग्दर्शक आणि यशची दीड वर्षाची तयारीयशच्या नव्या चित्रपटाचे नाव सध्या 'यश १९' असे आहे. अधिकृत नाव आणि कलाकार ८ डिसेंबर रोजी जाहीर केले जातील. हा चित्रपट ड्रग्ज माफियांवर आधारित असून गीतू मोहनदास याचे दिग्दर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे. यशबद्दल सांगायचे तर तो २०२२ मध्ये KGF 2 मध्ये दिसला होता. या चित्रपटानंतर यशने स्वत:ला नव्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त ठेवले होते. आता तब्बल दीड वर्षानंतर त्याचा नवा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे.

टॅग्स :यशसाई पल्लवी