साउथची अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) दिग्दर्शक नितेश तिवारी(Nitesh Tiwari)च्या 'रामायण' (Ramayan Movie) मध्ये सीताची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी ती कठोर मेहनत घेते आहे. नुकतीच साई पल्लवी बनारसला गेली होती आणि तिथे तिने माता अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेतला. साई पल्लवीच्या सोज्वळ सौंदर्यांची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. चाहत्यांना तिचा साधेपणा खूप भावतो.
साई पल्लवीच्या एका फॅन पेजने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या गळ्यात झेंडूच्या फुलांच्या माळा परिधान केलेल्या पाहायला मिळत आहेत. तिच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला पाहायला मिळत आहे. ती हात जोडून अन्नपूर्णादेवीसमोर उभी राहून आशीर्वाद घेताना दिसते आहे.
काही आठवड्यांपूर्वी सोशल मीडियावर चर्चा झाली होती की, नितेश तिवारीच्या रामायणमध्ये सीताची भूमिका साकारण्यासाठी तिने नॉनव्हेज खाणे सोडले. मात्र साई पल्लवीने हे वृत्त फेटाळून लावले. तिने ही अफवा असल्याचे म्हटले. साई पल्लवीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'बहुतेक वेळा, जेव्हा मी निराधार अफवा, बनावट खोटे आणि खोटी विधाने पसरवताना पाहते तेव्हा मी गप्प बसते. ते खोटे कुठल्यातरी हेतूने किंवा हेतूशिवाय पसरवले जात आहे, हे देवालाच माहित. पण आता या गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याची वेळ माझ्यावर आली आहे. अशा गोष्टी खूप दिवसांपासून घडत आहेत, विशेषतः चित्रपटाच्या वेळी.