Join us  

नागा चैतन्यच्या साखपुड्यानंतर समांथाला कोणी घातली लग्नाची मागणी? हे 'फिल्मी' प्रपोजल होत आहे Viral; व्हिडीओ पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 12:41 PM

नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाला एकाने प्रपोज केलं आहे.

तीन वर्षांपूर्वी समांथा रूथ प्रभूपासून (Samantha Ruth Prabhu) विभक्त झाल्यावर तेलुगू अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. नागा चैतन्यने नुकतंच 8 ऑगस्ट रोजी अभिनेत्री शोभिता धुलीपालसोबत साखरपुडा केला.   बऱ्याच काळापासून तो व अभिनेत्री शोभिता धुलीपाला (Sobhita Dhulipala) डेटिंग करत असल्याच्या चर्चा होत्या. नागा चैतन्य आणि शोभिताचं नेटकऱ्यांनी अभिनंदन केलं आहे. तर अनेकांनी नागा चैतन्य आणि शोभिताला ट्रोल केलं आहे. तर दुसरीकडे नागा चैतन्यची पुर्व पत्नी आणि अभिनेत्री समांथाला एका चाहत्याने थेट लग्नाची मागणी घातली. एवढंच नाही, तर त्याच्या प्रपोजला समांथानेदेखील ()Samantha responds to fan marriage proposal) उत्तर दिलं आहे. 

गेल्या काही वर्षांपासून समांथा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप वाईट टप्प्यातून गेली आहे. तिने 2017 मध्ये नागा चैतन्यशी लग्न केले, परंतु 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सामंथा आणि नागा चैतन्य यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले आणि त्यांचे नाते अशा प्रकारे संपुष्टात येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. यानंतर समंथाला आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पण तिने हसतमुखाने प्रत्येक अडचणीचा सामना केला. नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या साखपूड्यानंतर चाहते समांथाला खूप प्रेम देत आहेत. 

एका चाहत्याने तर समांंथाला थेट लग्नासाठी प्रपोज केले आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणतो, 'मी माझी बॅग घेऊन सामंथाच्या घरी जायला निघतोय. तिला हे सांगायला की तू काळजी करू नकोस कारण मी नेहमी तुझ्या सोबत असेन. 'मी लग्नासाठी तयार आहे मला फक्त २ वर्षांचा वेळ दे जेणेकरून मी कमावता होईन. त्यानंतर तो अभिनेत्रीला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे'. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून समांथापर्यंत पोहचला. यावर तिने प्रतिक्रियादेखील दिली आहे. समांथाने कमेंट केली की, 'तुझ्या पाठीमागची जीम पाहून मी जवळपास तयारचं झाले'. समांथाची ही कमेंट पाहून चाहत्यांच्या आनंद तर गगनात मावेनासा झाला. समांथाने हा विनोद अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतल्याचे पाहून त्याला आनंद होत आहे.

शोभिता धुलिपालासोबत नागा चैतन्यचा सारखपुडा झाल्यासापासून समांथाचे चाहते तिच्यासाठी चिंतेत आहेत.  नागा चैतन्यच्या साखरपुड्यावर सामंथाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर समांथा लवकरच 'सिटाडेल: हनी बनी' या थ्रिलर सिरीजमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये वरुण धवन देखील आहे. ही सिरीज OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज केली जाईल. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीलग्नसोशल मीडिया