Join us

नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यावर समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये? 'या' दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:20 IST

व्हायरल फोटोंमुळे समांथा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय

समांथा ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. समांथाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 'फॅमिली मॅन २', 'सिटाडेल हनी बनी' अशा वेबसीरिजमधून समांथाने बॉलिवूडमध्येही आता पाय रोवण्यास सुरुवात केलीय. समांथाचे जगभरात असंख्य चाहते आहात. काही महिन्यांपूर्वी समांथाचा अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाला. यानंतर समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

समांथा पुन्हा रिलेशनशीपमध्ये?

समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर वर्ल्ड पिकलबॉल लीग मॅचचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. चेन्नई सुपर चँप्स या पिकलबॉल टीमची समांथा मालकीण आहे. या फोटोंमध्ये समांथा दिग्दर्शक राज निदिमोरु यांच्यासोबत दिसतेय. दोघेही पिकलबॉल संघाला चिअरअप करताना दिसत आहेत. दोघांचे एकत्र फोटो पाहून आणि त्यांच्यातली खास मैत्रीपूर्ण केमिस्ट्री बघता समांथा आणि राज यांच्यात काहीतरी शिजतंय, अशा चर्चांना उधाण आलंय. याविषयी समांथा किंवा राज या दोघांपैकी कोणीही अधिकृत खुलासा केला नाहीये.

कोण आहे राज निदिमोरु?

तुम्हाला राज आणि डीके ही दिग्दर्शक जोडी माहित असेलच. 'द फॅमिली मॅन', 'फर्जी', 'सिटाडेल हनी बनी', 'गन्स अँड गुलाब' या वेबसीरिजचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केलंय. या दोघांपैकी राज निदिमोरु आणि समांथा हे दोघे सध्या रिलेशनशीपमध्ये असल्याचा अंदाज समांथाच्या चाहत्यांना आहे. 'सिटाडेल' आणि 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजसाठी समांथाने राजसोबत काम केलंय. हे दोघं आता 'रक्तब्रम्हांड' या आगामी प्रोजेक्टवर काम करत आहेत.

 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodबॉलिवूड