Join us

14 वर्षांपूर्वी अशी दिसायची समांथा, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले, 'पूर्ण चेहराच ट्रान्सप्लांट...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 10:07 IST

१४ वर्षात एवढा बदलला चेहरा?

समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिचा दबदबा राहिला आहे. तर आता हिंदीतही ती लोकप्रिय झाली आहे. समांथा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोट, मायोसायटिस आजार, घटलेलं वजन अशा अनेक गोष्टींना ती तोंड देत आहे. दरम्यान समांथाचा १४ वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.  यामध्ये तिला ओळखणंही कठीण आहे.

समांथा सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या लुक्सवर चाहते फिदा आहेत. पण १४ वर्षांपूर्वी समांथा अशी दिसायची नाही. तिचा चेहरा पूर्णपणे बदलला आहे. समांथाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय जो एका जाहिरातीचा आहे. गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर ती हसत आहे तर कधी डान्स करत आहे. पण तिचा चेहरा पाहून लोकांना विश्वासच बसत नाही की हीच समांथा आहे. 

हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी लिहिले, 'मला दोघी वेगळ्याच अभिनेत्री वाटत आहेत', 'ही समांथा नाही वाटत', 'बोटॉक्स, फिलर्स, सर्जरी', 'तिने पूर्ण चेहराच ट्रान्सप्लांट केला आहे'. अनेकांनी समांथाची तुलना रश्मिका मंदानाशी केली. एकाने लिहिले, 'तर समांथा रश्मिकासारखी दिसायची', 'मलाही आधी रश्मिकाच वाटली'.

तर दुसरीकडे कमेंट्स सेक्शनमध्ये काही लोक समांथाच्या बाजूनेही आले आहेत. एकाने लिहिले, 'हे फक्त तिच्या गालावरची चरबी आहे जी सहसा १८ ते २० च्या वयानंतर निघून जाते.','जर त्वचेची काळजी घेतली तर स्त्रिया ३० नंतर आणखी सुंदर दिसतात.'

समंथा रुथ प्रभूची नुकतीच 'सिटाडेल हनी बनी' ही सीरिज रिलीज झाली आहे. यामध्ये तिने वरुण धवनसोबत अॅक्शन सीन्स दिले आहेत. 

टॅग्स :समांथा अक्कीनेनीTollywoodट्रोलसोशल मीडिया