सिनेइंडस्ट्रीमध्ये जेवढा झगमगाट आहे तेवढेच त्याचे दुष्परिणामदेखील आहे. कित्येकदा कलाकारांना आपले स्थान निर्माण करण्यासाठी अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. यातील एक बाब म्हणजे कास्टिंग काउच. कित्येक प्रसिद्ध अभिनेत्री कास्टिंग काउचला बळी पडल्या आहेत. दरम्यान नुकतेच एका अभिनेत्रीचा कास्टिंग काउचचा किस्सा ऐकायला मिळतो आहे. एवढंच नाही तर तिचा १४ मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत.
तमीळ अभिनेत्री श्रुती नारायणन(Shruthi Narayanan)चा १४ मिनिटांचा एक व्हिडीओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड होतो आहे. हा व्हिडीओ ऑडिशनच्या दरम्यान लीक झाला होता. श्रुती नारायणनचा हा व्हिडिओ X अकाउंट, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर व्हायरल झाला आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी व्हिडिओमधील कथित शोषणावर नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी त्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी असा अंदाज लावला की हा व्हिडीओ डीपफेक असू शकतो.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्याच वेळी, #ShruthiNarayananLeaked X हँडलवर ट्रेंड करत आहे, ज्यावर २ लाखांहून अधिक पोस्ट करण्यात आल्या आहेत. श्रुती नारायणनच्या आधी त्रिशा कृष्णन आणि अमला पॉल यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींशी संबंधित असेच प्रकरण समोर आले होते, जे नंतर खोटे असल्याचे उघड झाले होते.
कोण आहे श्रुती नारायणन?श्रुती नारायणनने वयाच्या २४व्या वर्षी तमिळ टीव्ही मालिकांमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. नंतर, सिरागडिक्का असाई सारख्या शोमधून अभिनेत्रीला ओळख मिळाली. मात्र, तिला खरे यश मिळाले जेव्हा तिने चित्रपटात पाऊल ठेवले. इंस्टाग्रामवर तिचे ४ लाख २० हजार फॉलोअर्ससह आहेत.