Join us

साऊथ अभिनेते पान मसालाची जाहिरात का करत नाही? सिद्धार्थ म्हणाला, 'कमल हसन, रजनी सरांनी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 14:38 IST

एकही साऊथ अभिनेता पान मसाला, धूम्रपानाची जाहिरात का करत नाही माहितीये का?

'रंग दे बसंती' फेम साऊथ अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) लवकरच आदिती राव हैदरीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. या गोड कपलची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. सिद्धार्थ साऊथ सिनेसृष्टीत लोकप्रिय आहे. तो आगामी 'इंडियन 2' मध्ये दिसणार आहे. 28 वर्षांनी 'इंडियन' सिनेमाचा सीक्वेल येत आहे ज्यात अभिनेते कमल हसनही (Kamal Hassan) आहेत. नुकतंच सिनेमाच्या प्रमोशनवेळी सिद्धार्थने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने साऊथ अभिनेते धूम्रपान, पान मसालाच्या जाहिराती का करत नाहीत याचं कारण सांगितलं.

'न्यूज 18 शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला, "आम्हाला आमच्या दिग्गजांचा अभिमान वाटतो. त्यांनी नेहमीच आम्हाला योग्य मार्ग दाखवला. उदाहरणार्थ रजनी सर आणि कमल सर दोघांनी बरेच वर्षांपूर्वीच एक निर्णय घेतला होता जो आजपर्यंत त्यांनी पाळला. तो निर्णय म्हणजे कधीही धूम्रपान, पान मसालाच्या सारख्या गोष्टी प्रमोट करायच्या नाहीत. जर तेव्हा त्यांनी याच्या जाहिराती केल्या असत्या तर नंतर इतर साऊथ अभिनेत्यांनीही हे केलं असतं. पण आम्ही असं करत नाही कारण रजनी सर, कमल सरांनी तो नियमच सेट केला आहे."

सिद्धार्थच्या उत्तरानंतर कमल हसन म्हणाले, "जेव्हा आम्ही 20-30 वर्षांचे  होतो तेव्हाच आम्ही नियम केला होता की आम्ही एकमेकांवर कधीच कमेंट करणार नाही. जेव्हाही मी काही नवीन करतो रजनीकांत आवर्जुन येतात आणि जेव्हा ते काहीतरी नवीन करतात मीही जातो."

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीकमल हासनरजनीकांत