Shobhita Naga Chaitanya wedding : अभिनेता नागा चैतन्य पुन्हा संसार थाटण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी ८ ऑगस्टला साखरपुडा केला होता. साखरपुड्यानंतर आता दोघे लग्नबंधनात अडकत आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या एंगेजमेंटनंतर त्यांच्या लग्नाची तारीख पक्की झाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचा मुहूर्त नेमका कधी आहे, हे जाणून घेऊया.
नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी हजेरी लावणार आहेत. येत्या 4 डिसेंबर 2024 रोजी दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण, अद्याप नागा चैतन्य आणि शोभिता यांनी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.
नुकतेच शोभिताच्या घरी लग्नपूर्वीचा Godhuma Raayi Pasupu danchatam म्हणजेच हळद कांडण्याचा कार्यक्रम पार पडला. याचे काही फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. नागा चैतन्यचं शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने समांथा रुथ प्रभूशी लग्नगाठ बांधली होती. २०१७ मध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकले होते. मात्र अवघ्या काही वर्षांतच त्यांचा संसार मोडला. २०२१ मध्ये घटस्फोट घेत वेगळं झाल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं.