Join us

नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालाला कसं केलं होतं प्रपोज, अभिनेत्रीनं केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:29 IST

नुकतंच शोभितानं नागा चैतन्या याने तिला कसं प्रपोज केलं, याची गोष्ट सांगितली. 

नागा चैतन्य  (Naga Chaitanya) आणि शोभिता धुलिपालाचे (Sobhita Dhulipala) लग्न गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये झाले. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या दोघे त्याच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. शोभितापूर्वी नागा चैतन्यचे लग्न समंथाशी झाले होते. पण, २०२१ मध्ये दोघेही वेगळे झाले. यामुळे शोभिता आणि नागा चैतन्य हे लग्नानंतर देशभरात चर्चेत आले होते. काहींना त्यांना ट्रोल केलं. तर काहींना शुभेच्छा दिल्या. आता नुकतंच शोभितानं नागा चैतन्य याने तिला कसं प्रपोज केलं, याची गोष्ट सांगितली. 

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी नुकत्याच व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी प्रपोजलबद्दल बोलताना शोभिता म्हणाली, "हे अगदी नैसर्गिकरित्या घडलं. तो माझ्या पालकांना भेटला. मी त्याच्या पालकांना भेटले आणि आम्हाला सर्वांचे आशीर्वाद मिळाले. सर्वांनी हो म्हणताच, नागा चैतन्य एका गुडघ्यावर बसला आणि माझा हात मागितला".

शोभिता आणि नागा सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते एकमेंकासोबतचे फोटो शेअर करत असतात. 'थंडेल'च्या प्रमोशनवेळीच नागा चैतन्यने खुलासा केला होता की तो शोभिताला घरी 'बुज्जी थल्ली' नावाने बोलवतो. दरम्यान,  ऑक्टोबर २०२१ मध्ये समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताला त्याच्या हैदराबादच्या घरी पाहुणी म्हणून बोलवले होते. यावेळी दोघांना अनेकांनी एकत्र पाहिले होते. तेथून दोघांच्या डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या.  

टॅग्स :सेलिब्रिटीTollywood